Photos : जनसामान्यांचा लोकप्रिय नेता भारत भालके!
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारा नेता आणि जमिनीशी नाळ ठेवून काम करणारा नेता म्हणून ओळख असलेले पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं अखेर निधन झालं.

वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या रुबी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारा नेता आणि जमिनीशी नाळ ठेवून काम करणारा नेता म्हणून ओळख असलेले पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं अखेर निधन झालं.
- वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या रुबी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
- भारत भालके यांना 30 ऑक्टोबर 2020 रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर चार दिवसात त्यांनी कोरोनावर मातही केली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
- मात्र, दिनांक 26 नोव्हेंबरपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा आजार असल्याने ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते.
- पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते स्वत:ही पेशाने शेतकरी होते. दहावीपर्यंत शिकलेल्या भालके यांनी राजकारणात मात्र चांगला जम बसवला होता.
- भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते.
- देशासह राज्यात भाजपची लाट असल्याने 2019च्या निवडणुकीत ते काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार होते. पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विजयाची हॅट्रीकही साधली.
- भालके हे त्यांच्या सेवाभावी कामांमुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.
- या वर्षी पंढरपुरात महापूर आल्यावर भालके यांनी पूरग्रस्त भागांची अनोख्या पद्धतीने पाहणी केली होती. पुरातून स्वत: होडी चालवून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता.