आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते.
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरातील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर शेवंतीच्या फूल आणि बेलपत्रांनी सजवले होते.
विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील ही सजावट करण्यासाठी जवळपास दोन टन पाना-फुलांचा वापर करण्यात आला होता.
मंदिरातील देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि, तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी सजवण्यात आला होता.
विशेष म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्त विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले होते.
तर रुक्मिणीमातेला पिस्ता रंगाची साडी परिधान करण्यात आली होते.
त्यामुळे सावळ्या विठुराया आणि रुक्मिणीमातेचे रुपडं अधिकच खुलून दिसत होते.
विशेष म्हणजे आज महाशिवरात्र असल्याने या सजावटीमध्ये बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमेचा देखील कल्पतेने वापर केला आहे.