विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला.
मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली.
भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला.
पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर पूजा अर्चना केली आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडल्या.
दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली.
गवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे ऑनलाइन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.