परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना-रासप-रिपाई-रयतक्रांती महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर परळीत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून रॅलीला संबोधित केलं.
पंकजा मुंडेंच्या या रॅलीला खासदार प्रीतम मुंडे, यशस्री मुंडे, माजी आमदार गोविंद केंद्रे आणि इतर नेते उपस्थित होते.
याअगोदर परळीतील निवासस्थानी पंकजा मुंडे यांचं औक्षण करण्यात आलं. वैजनाथाचं आणि गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
परळीत विरोधकांचं आव्हान नसून विजय आपलाच आहे असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
पंकजा मुंडेंच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.