PHOTO | सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळ; स्वयंसेवी संस्था पाठवणार 14 हजार लाडू!

करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत लेह-लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथील सीमेवरील सैनिकांना चौदा हजार पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत.

| Updated on: Nov 11, 2020 | 2:56 PM
दिवाळीच्या दिवशी सैनिकांबद्दल असलेल्या प्रेम आणि कृतज्ञतेपोटी त्यांना आपल्या हाताने बनवलेला फराळ खाऊ घालावा, अशी संकल्पना पनवेल येथील भारतीय विकास परिषदेला सूचली. त्यांनी ती पूर्णत्वासही नेली. करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत लेह-लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथील सीमेवरील सैनिकांना चौदा हजार पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत.

1 / 6
सीमेवर फराळ पाठवणे सहज, सोपे नाही. कारण फराळातील प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, टिकावूपणा, पदार्थ बनवताना वापरलेले साहित्य, पाठविण्यासाठी लष्कराचे नियम तसेच संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी अशी सगळी प्रक्रिया पार पाडली. लष्कराच्या गुणवत्ता यादीत परिपूर्ण उतरणारा, पौष्टिक लाडू तयार करून देण्याची तयारी डोंबिवली येथील "लाडू-सम्राट" यांनी दर्शवली. अशा रितीने "जवानांनासाठी पौष्टिक लाडू" पाठविण्याचा संकल्प भाविप संस्थेला पूर्ण करता आला, अशी माहिती संस्थेच्या पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.

2 / 6
लेह, लडाख येथील हवामानाचा अंदाज घेऊन ऑक्टोबर महिन्यातच पाच हजार लाडवांची पहिली खेप पाठवण्यात आली. उर्वरित नऊ हजार लाडू उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम येथे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवण्यात आले.  लाडुंबरोबरच अनेकांनी तयार केलेली शुभेच्छा पत्रे आणि संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र यांची स्वरचित कविता शुभेच्छा पत्राला जोडून छान संदेश पाठवण्यात आला, असे पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.

3 / 6
 सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आणि संस्थेवरील विश्वासामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातील वेगगेळ्या भागातून जवळपास चारशे लोकांनी उत्स्फुर्तपणे निधी पाठवून या उपक्रमात मोलाचे योगदान दिले, असंही त्यांनी सांगितलं.

4 / 6
सैनिकांसाठी लाडू पाठवण्याची पक्रिया पार पाडत असताना करोनाचे संकटाचे भान ठेवून संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर राखून शेवटची खेप पाठवताना सलग 12 तास काम केले.

5 / 6
संस्थेचे हे पहिलेच वर्ष असूनही सैनिकांना दिवाळीसाठी फराळ म्हणून लाडू पाठवण्याचे शिवधनुष्य भाविपने यशस्वीरित्या पेलले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव कमांडर दीपक जांबेकर, खजिनदार नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

6 / 6
Follow us
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.