पनवेलमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र पनवेल मनपा क्षेत्रात आओ जाओ घर तुम्हारा! असे चित्र पाहायला मिळत आहे. पनवेलमध्ये दररोज ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहेत.
1 / 9
पनवेलमधील खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र पनवेल मनपा याकडे कानाडोळा करत आहे.
2 / 9
या सेंट्रल पार्कमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करत आहे. तसेच या ठिकाणचे पार्किंगसुद्धा हाऊसफुल पाहायला मिळत आहे.
3 / 9
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात खारघर शहरात सर्वाधिक रुग्ण आहे. तर त्यापाठोपाठ कळंबोली आणि नवीन पनवेल शहर या दोन ठिकाणांचा समावेश आहे.
4 / 9
पनवेलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजाराच्यावर गेला आहे. तरीही नागरिकांकडून नियम पाळण्यात हलगर्जी होत आहे.
5 / 9
खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
6 / 9
पनवेलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजाराच्यावर गेला आहे. तरीही नागरिकांकडून नियम पाळण्यात हलगर्जी होत आहे.
7 / 9
मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी हे सर्वाधिक पनवेल, नवी मुंबई या मनपा क्षेत्रात आढळतात.
8 / 9
त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणीच लागण झाल्याचे समोर आलं होतं. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सर्व आस्थापना सुरू झाल्याने कोविड रुग्णांचा आकड्यात वाढ होत आहे.