कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लागू आहेत. याच निर्बंधांविरोधात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमन दिलं आहे, त्यासंदर्भात लवकर आदेश काढावेत. शहरात नियमांबाबत शिथिलता देण्यासाठी मी गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय. मात्र त्यावर अजूनही निर्णय का नाही ? असा सवाल केलाय. मात्र, आता पुण्यात निर्बंध लागू असूनही लोक त्याचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.