'अगं बाई अरेच्चा', 'दे धक्का', ' गोलमाल', 'जत्रा' आणि 'सिंबा' अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो.
मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही त्याला संबोधलं जातं. एकदम हटके आणि वेगळं काही तरी परिधान करुन तो नेहमीचं रसिक प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्याना प्रचंड आवडतो.
अख्या महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा अस्सल मराठी माणूस असला तरी त्यानं बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या शैलीनं खास ओळख बनवली आहे.
आता त्यानं मस्त फोटोशूट केलं आहे. त्यानं या नव्या फोटोशूटचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
'People' Champ ??????...'असं कॅप्शन देत सिद्धार्थनं हे फोटो शेअर केले आहेत.