कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर तातडीने कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेता येऊ शकतात. पण तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर CT Scan करु नका असं आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून करण्यात आलं आहे.
Dr. randeep guleria
आपल्या फुफ्फुसात किती इन्फेक्शन आहे याची माहिती मिळवण्यासाठी CT Scan केला जातो. त्याद्वारे HRCT स्कोअर पाहिला जातो. त्यानुसार मग कोरोना रुग्णांवर उपचार केला जातो. तसंच त्याला गोळ्या-औषधं दिली जातात. मात्र, तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर CT Scan करण्याची गरज नसल्याचं AIIMS कडून सांगण्यात आलं आहे.
एखाद्या कोरोना रुग्णाला मोठ्या प्रमाणात खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत असेल. तसंच त्याला श्वसनालाही त्रास होत असेल तर त्याचा CT Scan केला जातो. त्याच्या रिपोर्ट नुसार त्याच्यावर योग्य ते उपचार सुरु केले जातात. त्यामुळे तुम्हाला श्वसनाला काही त्रास नसेल, तसंच खोकला नसेल तर CT Scan करण्याची गरज नसल्याचं डॉक्टरांकडूनही सांगितलं जातं.
घरातील विलगीकरणात राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.