Photo : परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील बीड दौऱ्यावर, गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडेंना आदरांजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त जयंत पाटील सध्या राज्याच्या विविध भागाच्या दौऱ्यावर आहेत. परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला गोपीनाथ गडावर जात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.
Most Read Stories