दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बारामतीत रणरागिनींची सायकल रॅली पाहायला मिळाली.
बारामतीत आयोजित केलेल्या या सायकल रॅलीत 300 महिलांनी सहभाग नोंदवला.
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत बारामती सायकल क्लब, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि भगिनी मंडळाच्या वतीनं ही सायकल रॅली काढण्यात आली होती.
बारामतीतील तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक अशी ही रॅली काढण्यात आली.
पाहा आणखी काही फोटो