Photo : संभाजीराजेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; आझाद मैदानावर कार्यकर्त्यांची रिघ, सरकारकडून अद्याप ठोस भूमिका नाही

15 दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे’, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

| Updated on: Feb 27, 2022 | 5:59 PM
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी उपोषणास्त्र उपसलं. मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत.

1 / 7
संभाजीराजे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही या उपोषणात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर राज्यभरातूनही विविध मराठा संघटना आणि नेत्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देत उपोषण सुरु केलं आहे.

2 / 7
महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही शनिवारी संध्याकाळी संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये. भारतीय जनता पार्टी या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावे, असं आवाहन फडणवीस यांनी केलंय.

3 / 7
दरम्यान, 15 दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही, अशी खंत व्यक्त करत संभाजीराजे यांनी कालपासून उपोषण सुरु केलंय.

4 / 7
महत्वाची बाब म्हणजे काल दिवसभरात सत्ताधारी पक्ष किंवा सरकारकडून कुणीही संभाजीराजे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचलं नव्हतं. त्यामुळे समाज माध्यमांवर सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

5 / 7
त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे यांनी आझाद मैदानावर जात संभाजीराजे यांची भेट घेत विचारपूस केली. तसंच त्यांच्याशी चर्चाही केली.

6 / 7
आता सरकारकडून संभाजीराजे यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते आणि संभाजीराजे सरकारनं एक पाऊल पुढे टाकल्यास आपणही एक पाऊल पुढे येतात का यावर मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे.

7 / 7
Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.