Photos | अकलूजच्या घोडेबाजारात आकर्षण ठरला 50 लाखांचा क्रोबा घोडा, पाहायला मोठी गर्दी

रवी लव्हेकर, अकलूज | पश्चिम महाराष्ट्रातील अकलूज येथील घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यातून नामवंत जातीचे घोडे येथे विक्रीसाठी दाखल होतात. दरवर्षी या घोडेबाजारात सात ते आठ कोटीची उलाढाल होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हा बाजार भरविला जातो. विषेश म्हणजे यंदा 50 लाखांचा घोडा विक्रीसाठी आला आहे. देशभर त्याची चर्चा आहे.

| Updated on: Nov 05, 2023 | 3:08 PM
सोलापूर जिल्ह्याची सहकार आणि कृषी पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकलूज येथे दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घोडे बाजार भरवला जातो. या बाजारात जातीवंत घोडे विक्रीसाठी देशभरातून आणले जातात.

1 / 5
यंदा अकलूजच्या घोडे बाजारात उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून काटेवाडी, मारवाड, पंजाब, सिंध असे जातीवंत घोडे विक्रीसाठी आले आहेत, यावर्षी जवळपास दोन हजारहून अधिक घोडे बाजारात दाखल झाले आहेत.

2 / 5
घोडे व्यापारी आणि ग्राहकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगली सोय केली आहे. घोड्यांसाठी चारा ,पाणी, सावली, आरोग्य सेव तसेच चोख सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांना राहण्याची सोय देखील केली आहे.

3 / 5
वाढत्या महागाईच्या काळातही घोडे बाजारात तब्बल पन्नास लाखाचा घोडा विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे असे महागडे घोडे पाहण्यासाठी हौशी लोक, घोडे खरेदीदार, व्यापारी येऊ लागल्याने अकलुजच्या घोडे बाजाराची चर्चा देशभर पसरु लागली आहे.

4 / 5
उत्तरप्रदेशच्या बरेलीतून आलेल्या कोब्रा नावाच्या घोड्याची किंमत तब्बल 50 लाख रूपये आहे. या घोड्याचे पाय, शेपटी, कान डोळयाच्या कडा सुध्दा काळया आहेत. हा घोडा मारवाड जातीचा तेलीया कुम्मेत प्रकारातील असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील आणि सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.