Marathi News Photo gallery Photos | Kroba horse worth 50 lakhs became the attraction in horse market of Akluj, huge crowd to see it
Photos | अकलूजच्या घोडेबाजारात आकर्षण ठरला 50 लाखांचा क्रोबा घोडा, पाहायला मोठी गर्दी
रवी लव्हेकर, अकलूज | पश्चिम महाराष्ट्रातील अकलूज येथील घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यातून नामवंत जातीचे घोडे येथे विक्रीसाठी दाखल होतात. दरवर्षी या घोडेबाजारात सात ते आठ कोटीची उलाढाल होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हा बाजार भरविला जातो. विषेश म्हणजे यंदा 50 लाखांचा घोडा विक्रीसाठी आला आहे. देशभर त्याची चर्चा आहे.