अभिनेत्री ईशा गुप्ता सातत्याने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. ती सध्या सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेलीय. तिने त्या ठिकाणावरील आपला एक हटके फोटो शेअर केलाय.
ईशा गुप्ताचा हा कफ्तान लूक खूपच सुंदर दिसतोय. विशेष म्हणजे हा ड्रेस उन्हाळ्यासाठी परफेक्ट मानला जातोय. त्यावरुन तुम्ही इंस्पिरेशन घेऊ शकता आणि आपल्या कपड्यांच्या खास कलेक्शनमध्ये याचा समावेश करु शकता.
Follow us

बेरी कलरच्या या ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे ट्विद प्रिंट करण्यात आलेत. या क्रीप सिल्क कफ्तानमध्ये कोवरी शेलचं डिटेलिंग करण्यात आलंय. या ड्रेसला अजाइमेट्रिक हेमसोबत व्ही-नेक देण्यात आलाय.
ईशाने या ड्रेससोबत सोन्याची ईअररिंग्स, हिऱ्याची अंगठी आणि मनगटात घड्याळ घातलंय. या लूकमध्ये अगदी मिनिमल मेकअप केलाय. यात ऑन-पॉइंट हायलायटर, सबटल ब्लश, मस्करा-लँडेन लॅशेज, न्यूड कलर्ड लिप आणि भरपूर हाईलाइटरचा वापर करण्यात आलाय.
ईशाचा हा ड्रेस डिझाईनर अर्पिता मेहताने डिझाईन केलाय. त्याची किंमत 11,000 रुपये इतकी आहे. तुम्हाला हा ड्रेस घ्यायचा असेल तर इतकीच किंमत मोजावी लागेल.