Photos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते
समोर आलेल्या कार्यकर्त्यांना निराश न करता थेट एक घाव दोन तुकडे हा अजित पवार यांचा स्वभाव असल्यानं त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात.
Follow us
समोर आलेल्या कार्यकर्त्यांना निराश न करता थेट एक घाव दोन तुकडे हा अजित पवार यांचा स्वभाव असल्यानं त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात.
बारामतीतही आज (24 जानेवारी) अजित पवार यांच्या भेटीसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या.
याच निमित्ताने अजित पवार यांनी नागरिकांची गाऱ्हाणी मांडल्यानंतर त्यावर तात्काळ निर्णय घेतला.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या परिसरात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
या ठिकाणी नागरिकांनी खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी लांबच लांब रांगा केल्या. कुणी सार्वजनिक कामासाठी, तर कुणी व्यक्तीगत गाऱ्हाणं घेऊन इथं आले होते.
अनेक नेते वातानुकुलित कक्षात बसून जनतेच्या अडीअडचणी ऐकतात. इथं मात्र रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांजवळ जाऊन अजित पवार त्यांचं म्हणणं ऐकतात.