Photos: मकर संक्रांतीनिमित्त अमित शाहांकडून जगन्नाथ मंदिरात पूजा, पतंगही उडवली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये मकरसंक्रांतीचा सण साध्या पद्धतीने साजरा केला.
यानंतर त्यांनी शहरातील आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन तेथे पतंग उडवण्याचाही आनंद घेतला.
Follow us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये मकरसंक्रांतीचा सण साध्या पद्धतीने साजरा केला.
गुजरातमध्ये हा सण उत्तरायण म्हणून साजरा होतो. अमित शाह यांनी आपल्या कुटुंबासोबत जगन्नाथ मंदिरात पूजा केली.
यावेळी मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
यानंतर त्यांनी शहरातील आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन तेथे पतंग उडवण्याचाही आनंद घेतला.
यावेळी शाह यांनी आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा केला. मात्र, याआधी ते या सणाला आपल्या समर्थकांसह स्थानिक नेत्यांच्या घरी पतंग उडवत असत.
शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “उत्तरायणाच्या या पवित्र प्रसंगी आज अहमदाबादच्या सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात पूजा केली. प्रभू जगन्नाथ सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवो. जय जगन्नाथ!”