PHOTOS: दीपिका पादुकोण आणि रणवीर हातात हात घेऊन बाहेर, मॅचिंगमध्ये दोघांचा स्टाईलिश लुक
पुन्हा एकदा दीपिका आणि रणवीर सिंह यांना बाहेर एकत्र फिरताना स्पॉट केलंय. त्यांच्या या भेटीचे फोटो वेगाने शेअर होत आहेत.
दीपिका आणि रणवीर यांनी मॅचिंग कपडे घालण्याची ही तशी पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधी देखील एकसारखे कपडे घातलेले दिसले आहेत. त्यातच त्यांचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
Follow us
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक असतात. दोन्ही स्टार्स जेव्हा एकत्र पाहायला मिळतात तेव्हा त्यांचे चाहते अगदी वेडे होऊन जातात. आता पुन्हा एकदा त्यांना बाहेर एकत्र फिरताना स्पॉट केलंय. त्यांच्या या भेटीचे फोटो वेगाने शेअर होत आहेत.
नुकतीच दीपिका पादुकोण पती रणवीर सिंहसोबत डिनर डेटवर गेल्याचं समोर आलं होतं. यावेळीचा त्यांचा लूक चांगलाच गाजला होता.
यावेळी दीपिका आणि रणवीरने मॅचिंग कपडे घातले होते. दोघे स्टार्स ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळाले. दोघांची जोडी यावेळी खूपच सुंदर दिसत होती.
दीपिका आणि रणवीर यांनी मॅचिंग कपडे घालण्याची ही तशी पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधी देखील एकसारखे कपडे घातलेले दिसले आहेत. त्यातच त्यांचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
रणवीर-दीपिका लग्नानंतर पहिल्यांदा 83 या चित्रपटात एकत्र पाहायला मिळतील. हा चित्रपट क्रिकेटपटू कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. रणवीर आणि दीपिकाला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला त्यांचे चाहते अगदी आतुर आहेत.