Photos : ‘या’ देशात दर 8 तासाला एका निरपराधाचा मृत्यू, आतापर्यंत 3.87 लाख लोकांचं हत्याकांड, डोळ्यात पाणी आणणारं वास्तव
मार्च 2011 मध्ये सीरियात राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या विरोधात एक शांततापूर्ण आंदोलन सुरु झालं. मात्र, या ठिकाणच्या हुकुमशाहांनी हे आंदोलन दडपण्यासाठी हिंसेचा अवलंब केला. पाहता पाहता संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला.
Follow us
मार्च 2011 मध्ये सीरियात राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या विरोधात एक शांततापूर्ण आंदोलन सुरु झालं. मात्र, या ठिकाणच्या हुकुमशाहांनी हे आंदोलन दडपण्यासाठी हिंसेचा अवलंब केला. पाहता पाहता संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला.
युनिसेफच्या माहितीनुसार, सीरियातील परिस्थिती इतकी खराब झालीय की मागील 10 वर्षात दर 8 तासाला सरासरी एक मुलगा आपला जीव गमावतो किंवा जखमी होतोय.
सीरियातील नागरिकांच्या सर्वच बाजूंनी दरी तयार झालीय. आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू सरकारच्या दडपशाहीत झालाय. दुसरीकडे सरकारचा विरोध करणाऱ्या गटानेही जवळपास 35,000 लोकांचा बळी घेतलाय.
सीरियातील कट्टर दहशतवादी संघटनांनीही 14,000 लोकांचे जीव घेतलेत. याशिवाय रशिया, इराण, तुर्की, अमेरिका आणि इतर इस्लामिक संघटनांचाही समावेश आहे.
सीरियातील गृहयुद्धात डिसेंबर 2020 पर्यंत 3,87,000 लोकांचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालाय. खरंतर मृत्यू होणाऱ्यांची खरी संख्या 5 लाख पेक्षा अधिक आहे.
अनेक वृत्तांनुसार 2,05,300 लोक आतापर्यंत गायब झालेत. ते जिवंत आहेत की मृत्यू झालाय याचीही माहिती मागील 10 वर्षात मिळालेली नाही.
लाखो लोकांच्या मृत्यूशिवाय सीरियात 21 लाख नागरिक गंभीर जखमी होऊन अपंग झाले आहेत.
तसेच 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपलं घर सोडावं लागलं. ते सध्या विस्थापितांच्या छावणीत राहत आहेत.