Photos : राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी
![Photos : राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी Photos : राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/01033151/Sanjay-Raut-daughter-engagement-0.jpg?w=1280)
- शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रम मुंबईत पार पडला.
- यावेळी राज्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांची रिंग सिरेमनी झाली.
- यावेळी पूर्वशीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत केकही कापला.
- विशेष म्हणजे राजकारणातील मुत्सद्दी म्हणून ओळख असलेल्या संजय राऊत यांच्या घरगुती कार्यक्रमाला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
- भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.
- यावेळी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी गळाभेटही घेतली.
- मान्यवरांनी राऊत यांच्या मुलीसह जावयांना बुके देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या,
- या घरगुती कार्यक्रमात राज्याच्या राजकारणात एकमेकांसमोर दंड थोपटणारे अनेक दिग्गज सोबत पाहायला मिळाले.