Photos : महाराष्ट्रातील प्रसिद्ध वटवृक्ष, ऐतिहासिक किल्ला आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांचं ठिकाण ‘पेमगिरी’
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं गाव म्हणजे पेमगिरी. या ठिकाणचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच नैसर्गिक सौदर्य आणि पर्यटनस्थळ म्हणूनही महत्त्व आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण वटवृक्ष आहे.
Follow us
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं गाव म्हणजे पेमगिरी. या ठिकाणचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच नैसर्गिक सौदर्य आणि पर्यटनस्थळ म्हणूनही महत्त्व आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण वटवृक्ष आहे. भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे. त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो. जवळपास अडीच ते तीन एकरांच्या परिसरात या झाडाने विस्तार केला आहे.
पेमगिरी हे गाव आपल्या नैसर्गिक सौदर्याने हजारो पर्यटकांना आपल्याकडे खुणावतं. या ठिकाणचे पावसाळ्यातील फेसाळणारे धबधबे तर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
पर्यटक या ठिकाणी केवळ धबधबे पाहण्याचा आनंद घेत नाही, तर त्या धबधब्याच्या पाण्याखाली अंघोळीचाही आनंद घेत असतात.
उंचच उंच डोंगरावरुन पाण्याचा नैसर्गिक प्रवाह डोंगरकडांवरुन खाली कोसळतानाचं दृष्य पर्यंटकांना खिळवून ठेवतं.
सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरांवरुन वाहणारं धबधब्याचं पाणी या काळ्या पाषाण दगडावर आपल्या स्पष्ट खुणा तयार करतं.
पेमगिरी येथील हे धबधबे केवळ स्थानिक पर्यटकांनाच नाही, तर अगदी राज्यातील विविध ठिकाणच्या पर्यटकांनाही खुणावतात.
पेमगिरी धबधब्यांचं हे ठिकाणी संगमनेरपासून 14 किलोमीटरवर आहे. हे ठिकाण गर्दीपासून लांब अगदी शांत ठिकाण आहे.
पावसाळ्यात या ठिकाणचं हिरवीगार सौदर्य आणि निळंशार आकाश पाहण्यासारखं असतं.
या ठिकाणी एक किंवा दोन धबधबे नसून लहान-मोठ्या धबधब्यांची मालिकाच आहे.
येथील धबधब्यांचं वैशिट्य म्हणजे आपल्याला आकाशात लांब कुठं तरी दिसणारा इंद्रधनुष्य या ठिकाण अगदी जवळून अनुभवता येतो. धबधब्याच्या खाली आपण या इंद्रधनुष्यांना हातही लावू शकतो आणि त्याला फोटोत कैदही करु शकतो.
त्यामुळे निसर्गाचं अप्रतिम सौदर्य पाहणाऱ्यांसाठी पेमगिरी हे पर्यटनस्थळ पर्वणीच आहे.
याशिवाय ऐतिहासिक पातळीवर पेमगिरीचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचं नाव भीमगड किंवा शाहगड असं आहे. यादव राजांनी इ.स. 200 मध्ये हा बांधला होता. दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापूरची आदिलशाही या दोन सत्तांनी मिळून निजामशाही संपवली. त्यावेळी मूर्तझा या अल्पवयीन असलेल्या निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसवून मराठा सुभेदार शहाजीराजे भोसले यांनी पेमगिरीच्या शाहगडावरुन 3 वर्षे राज्यकारभार चालवला असंही सांगितलं जातं.
पेमगिरी गावात पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे अनेक डोंगर आहे.
या ठिकाणी अस्सल ग्रामीण जीवनही पाहायला मिळतं.
पारंपारिक शेती पाहण्यासाठी देखील हे उत्तम पर्यटनस्थळ आहे.
येथील शेती देखील पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असते.
पेमगिरी गावात सागवान लाकडात बांधलेलं अत्यंत सुंदर हनुमान मंदिर देखील आहे.