PHOTOS : रंग बरसे… कोरोनाच्या दहशतीतही होळीचा उत्सव कायम
देशभरात कोरोनाच्या दहशतीतही होळीचा उत्सव आनंदात साजरा झालाय. कोरोनामुळे यंदाच्या होळीवर काही प्रमाणात नक्कीच परिणाम झालाय. मात्र, तरीही नागरिकांनी या परिस्थितीतही शक्य होईल तशी होळी साजरी करत आपल्या जगण्यात रंग भरलाय.
Holi Photos 2021: देशभरात कोरोनाच्या दहशतीतही होळीचा उत्सव आनंदात साजरा झालाय. कोरोनामुळे यंदाच्या होळीवर काही प्रमाणात नक्कीच परिणाम झालाय. मात्र, तरीही नागरिकांनी या परिस्थितीतही शक्य होईल तशी होळी साजरी करत आपल्या जगण्यात रंग भरलाय. त्याचेच प्रातिनिधीक फोटो...
Follow us
Holi Photos 2021: देशभरात कोरोनाच्या दहशतीतही होळीचा उत्सव आनंदात साजरा झालाय. कोरोनामुळे यंदाच्या होळीवर काही प्रमाणात नक्कीच परिणाम झालाय. मात्र, तरीही नागरिकांनी या परिस्थितीतही शक्य होईल तशी होळी साजरी करत आपल्या जगण्यात रंग भरलाय. त्याचेच प्रातिनिधीक फोटो…
लडाखमध्ये 17,000 फूट उंचीवर ITBP च्या जवानांनी होळी साजरी केली. हे ठिकाण चीनसोबत तणाव निर्माण झालेल्या गलवान खोऱ्याच्या जवळ आहे.
मुंबईत काहीशी हटके होळी पाहायला मिळाली. यावेळी रंग खेळणाऱ्या एका तरुणीचा हा भन्नाट फोटो.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे याचा परिणाम होळीवरही दिसला. अशातही मुंबईकरांनी शक्य होईल तसा होळीच्या उत्सवात सहभाग घेतला.
दिल्लीच्या सीमेवर मागील 4 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनातही होळीचे रंग पाहायला मिळाले. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह शेतकऱ्यांनी रंग उधळत आनंद साजरा केला.(PTI Photo/Manvender Vashist)
रंग बरसे…. कदाचित लखनौमधील लोकांनी याच गाण्यावर ठेका धरला होता. त्यावेळी काढलेला हा फोटो. (PTI Photo/Nand Kumar)
होळी साजरी करायला रंगच हवे असं कोण म्हणतंय. गुवाहाटीमध्ये तरुणांनी थेट चिखलातच होळी साजरी केली. (PTI Photo)