अमेरिकीची अंतराळ संशोधन संस्था नासाचं (National Aeronautics and Space Administration) नाव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि विकसित यंत्रसामुग्री अनेकांच्या चर्चेचा विषय असते. आज आपण नासाच्या अंतराळात चंद्रापासून मंगळापर्यंतच्या मोहिमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्पेस सूटबद्दल जाणून घेणार आहोत.
नासाच्या एका स्पेस सूटची किंमत जवळपास 87 कोटी रुपये आहे. त्यात अनेक विशेष सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या असल्याने या सूटची किंमत इतकी अधिक असते. स्पेस सूट केवळ एक सूट नसून छोटं अंतराळ यानच (स्पेस शिप) आहे (Space Suit Cost in Indian Rupees). त्यामुळेच प्रत्येक अंतराळवीर हा स्पेस सूट घालूनच अंतराळात जातो.
स्पेस सूटला एक बॅकपॅक देखील असते (Space Suit Backpack). याचा उपयोग अतंराळवीराला सूटमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासाठी होतो. या बॅकपॅकमधील फॅनच्या मदतीने सूटमधील कार्बन डायऑक्साईड बाहेर खेचतो.
याशिवाय स्पेस सूटमध्ये कम्प्यूटर, एअर कंडिशनिंग, ऑक्सिजन, पिण्याचं पाणी आणि एक इनबिल्ट टॉयलेटची व्यवस्थाही असते (Space Suit Backpack). यात वरील मूलभूत सुविधा तर असतातच त्याशिवाय अंतराळातील मिशन पूर्ण करण्यासाठी आणि अडथळ्यांमध्ये मदत होईल अशा व्यवस्थाही करण्यात आलेल्या असतात.
अंतराळातील तापमान खूप विचित्र पद्धतीने बदलत असते. त्यामुळे तेथे सूर्यासमोर अनेकदा रक्ताला उकळी फुटेल की काय अशी स्थिती असते, तर कधी रक्त गोठवणारी स्थिती तयार होते. (Space Suit Backpack).
अंतराळातील विषम तापमानाचा आणि घातक किरणोत्साराचा सामना करायचा असेल तर सुरक्षा कवच अत्यावश्यक असते. नाही तर जीवघेणे आजार होण्याचा धोका असतो (Space Suit Costume). म्हणूनच अंतराळवीरांच्या जीवाची सुरक्षा आणि मोहिम पूर्ण करण्यासाठी या महागड्या स्पेस सूटची गरज पडते.