Photos : बर्थडेच्या एक दिवसआधीही ‘नॅशनल क्रश’ कामात बिझी, रश्मिका मंदाना डबिंग स्टूडिओ बाहेर स्पॉट
5 एप्रिलला रश्मिकाचा 25 वा जन्मदिन आहे. मात्र, त्याआधी एक दिवस ती कामातच व्यग्र असल्याचं दिसून आलं.
-
-
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना साऊथनंतर आता बॉलिवूडमध्ये धमाल करणार आहे. तिने आपल्या दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटाची शुटिंगही पूर्ण केलीय. या चित्रपटात रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.
-
-
5 एप्रिलला रश्मिकाचा 25 वा जन्मदिन आहे. मात्र, त्याआधी एक दिवस ती कामातच व्यग्र असल्याचं दिसून आलं.
-
-
रश्मिका आज बांद्रामध्ये डबिंग स्टूडिओ बाहेर दिसली. यावेळी तिने डेनिमसोबत सफेद रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातलेला होता.
-
-
रश्मिका मिशन मजनू या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या चित्रपटात रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. नुकताच तिने या चित्रपटातील आपला लुक शेअर केला होता.
-
-
रश्मिकाचा दुसरा बॉलिवूड चित्रपट म्हणजे गुडबॉय असून त्यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसेल. या चित्रपटाचं नुकतंच चंदीगडमध्ये शुटिंग सुरु झालंय.
-
-
रश्मिकाचं चित्रपट सृष्टीतील करियर फार मोठं नाही, मात्र आतापर्यंत तिने जे चित्रपट केलेत ते सुपरहिट ठरलेत.
-
-
सध्या तरुणांमध्ये तिची मोठी क्रेझ असल्याचं पाहायला मिळतंय.