PHOTOS : प्रिंस फिलिप यांच्यावर राजेशाही परंपरेत अंतिम संस्कार, स्वतः डिझाईन केलेल्या लँड रोव्हर कारमधून अंत्ययात्रा
ब्रिटेनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप (Prince Philip) यांच्यावर शनिवारी (17 एप्रिल) राजेशाही इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना विंडसर कासलच्या सेंट जॉर्ज चॅपलमध्ये दफण करण्यात आलं.
Follow us
ब्रिटेनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप (Prince Philip) यांच्यावर शनिवारी (17 एप्रिल) राजेशाही इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना विंडसर कासलच्या सेंट जॉर्ज चॅपलमध्ये दफण करण्यात आलं. विंडसर कासल ब्रिटनच्या राणीचं अधिकृत निवासस्थान आहे.
कोरोनामुळे प्रिंस फिलिप यांच्या अंतिम संस्कारात केवळ 30 लोकांचाच समावेश होता. यात सर्व कुटुंबातील सदस्य होते. याशिवाय या कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन देखील सहभागी झाले होते.
प्रिंस फिलिप यांना ‘ड्यूक ऑफ एडिनबर्ग’ असंही म्हणतात. ते ग्रीस आणि डेन्मार्कच्या राजेशाही घरातील सदस्य होते. जर कोरोना नसता तर त्यांच्या अंत्य संस्काराला ब्रिटनमधील एक तृतियांश लोकसंख्या हजर राहिली असती.
सुरुवातीला या अंत्य संस्कारात 800 लोकांच्या सहभागाची तयारी करण्यात आली होती. मात्र, नंतर कोविड निर्बंधांमुळे ही संख्या 30 इतकी कमी करण्यात आली. यात महाराणी एलिझाबेथ यांचाही समावेश होता.
प्रिंस फिलिप यांची ही अंत्य यात्रा केवळ 50 मिनिटांची होती. यावेळी राणी एलिझाबेथ यांनी काळे कपडे घातले होते. त्यांच्यामागे त्यांची 4 मुलं, 8 नातू आणि 10 पणतू चालत होते.
प्रिंस फिलिप यांच्या मृतदेहाला फिलिप यांनी तयार केलेल्या लँड रोव्हर कारमध्येच ठेवण्यात आलं होतं. त्यांनी 1970 मध्ये ही कार डिझाईन केली होती.
फिलिप यांच्या मृतदेहावर त्यांची नौदलाची टोपी आणि तलवारही ठेवण्यात आली. ही तलवार राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडिल किंग जॉर्ज (सहावे) यांनी 1947 मध्ये प्रिंस फिलिप यांना एलिझाबेथसोबत लग्नानिमित्ताने भेट म्हणून दिली होती.