महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकभंरी नवरात्र महोत्सवास 21 जानेवारी रोजी दुर्गाष्टमी दिनी "आई राजा उदो उदो"च्या गजरात दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला.
Follow us
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकभंरी नवरात्र महोत्सवास 21 जानेवारी रोजी दुर्गाष्टमी दिनी “आई राजा उदो उदो”च्या गजरात दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला.
यानंतर पुन्हा सकाळी 6 वाजता देवीला पंचामृत अभिषेक घालून वस्त्रालंकार घालून धुपारती करण्यात आली. यानंतर मंदीरातील श्री गणेश ओवरीत पारंपारिक पद्धतीने शाकभंरी देवीजीची प्रतिमा ठेऊन शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ करण्यात आला.
अनादी काळी दुष्काळ पडल्यानंतर तुळजाभवानी मातेने भक्तांच्या हाकेला धावून येऊन पाऊस पाडला. त्यामुळे फळभाज्या पिके आली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मातेच्या 5 विशेष अलंकार पूजा केल्या जातात.
नवरात्र उत्सव असल्याने आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. नवरात्र सुरू झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
हा नवरात्र उत्सव 29 जानेवारीपर्यंत चालणार असून जलदिंडीसह अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे राजंनगाव येथील श्रीदेवी भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी श्री देवीच्या गाभाऱ्यासह संपूर्ण मंदीर परिसरात आकर्षक फुलाची सजावट केली होती.
या आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसरात भाविकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली.
आई तुळजाभवानी माता शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचा आकर्षक फुलांनी सजविलेला देखावा तयार करण्यात आला होता.
ही मनमोहक सजावट कॅमेरात टिपत अनेक भाविकांनी फोटो काढल्याने हा सेल्फी पॉईंट बनला.