PHOTOS : जगातील असे 10 देश ज्यांना पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तरीही पर्यटकांची पाठच
जगात असे 10 देश आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य हे पृथ्वीवरील स्वर्गच असल्याचं बोललं जातं. मात्र, कोरोनामुळे सध्या या ठिकाणांकडे पर्यटकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे.
निएउ: हे पोलिनेशिएन आयलंड शांत लाटा आणि मऊ वाळूसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर महिन्यात या बेटावर व्हेल्स मासे आपल्या पिल्लांना जन्म देतात. येथे दरवर्षी 10,000 पर्यटक येतात.
Follow us
जगात असे 10 देश आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य हे पृथ्वीवरील स्वर्गच असल्याचं बोललं जातं. मात्र, कोरोनामुळे सध्या या ठिकाणांकडे पर्यटकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे.
तुवालू: दक्षिण प्रशांत महासागरात 100 पेक्षा अधिक छोटे बेटं असणारा तुवालू देश जगातील सर्वात आगळावेगळा देश आहे. याच्या मुख्य बेट असलेल्या फुनाफुती बेटावर विमानतळ आहे. या विमानतळावरुनच परदेशी पर्यटक प्रवेश करतात. या ठिकाणी वर्षाला जवळपास 2000 लोक फिरण्यासाठी येतात.
किरीबाती: मध्य पॅसेफिक सागरात अनेक बेटं एकत्र येऊन बनलेला किरीबाती देश आहे. येथे खूप कमी संख्येने पर्यटक येतात. किरीबातीला दरवर्षी जवळपास 6000 पर्यटक येतात.
मार्शल आयलँड: अमेरिकेने या देशात मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र चाचण्या केल्याचं बोललं जातं. त्यामुळे या देशातील अनेक ठिकाणी रेडिओअॅक्टिव्हिटी आहे. असं असलं तरीही या ठिकाणचा निळाशार समुद्र अनेक पर्यटकांना खुणावतो. या ठिकाणी दरवर्षी 6000 लोक सुट्टीसाठी येतात.
निएउ: हे पोलिनेशिएन आयलंड शांत लाटा आणि मऊ वाळूसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर महिन्यात या बेटावर व्हेल्स मासे आपल्या पिल्लांना जन्म देतात. येथे दरवर्षी 10,000 पर्यटक येतात.
अमेरिकन समोआ: दक्षिण पॅसिफिकमध्ये असलेला अमेरिकन समोआ देश हिरवळीने भरलेला आहे. या ठिकाणचं नॅशनल पार्क ऑफ अमेरिकन समोआमध्ये पर्यटक खास ट्रेकिंगसाठी येतात. येथे दरवर्षी 20 हजार पर्यटक येतात.
सोलोमन आयलंड: स्कूबा डाइविंगसाठी सोलोमन आयलंड हे जगातील सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. एकेकाळी युद्धाचा मारा सहन करणाऱ्या या देशात आता दरवर्षी 26 हजार पर्यटक येतात.
कोमोरोस: समुद्रात मेडागास्कर आणि मोजाम्बिक बेटांमध्ये फसलेल्या कोमोरोस बेटावर स्वच्छ पाणी आणि पिवळा समुद्र किनारा आहे. दरवर्षी जवळपास 28 हजार लोक येथे भेट देतात.
साओ टोमे आणि प्रिंसिपे: साओ टोमे आणि प्रिंसीप बेट वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांनी भरलेला आहे. हिरव्यागार जंगलांमध्ये येथ कॉफीची शेती देखील होते. स्वर्गाहून सुंदर या ठिकाणी दरवर्षी 29 हजार पर्यटक येतात.
मायक्रोनेशिया : तुम्ही दररोज मायक्रोनेशियामधील एका बेटावर गेलात तरी येथील सर्व बेटं पाहायला तुम्हाला एक वर्ष लागेल इतकी बेटं इथं आहेत. मायक्रोनेशिया देश 607 बेटांचा मिळून बनलेला आहे. यातील बहुतांश बेटांवर लोकवस्ती नाही. दरवर्षी येथे 30 हजार पर्यटक भेट देतात.
जिबूती: अनेक देशांच्या सैन्याच्या छावण्या असलेल्या जिबूती देशाचं एक रणनीतीच्या बाबतीत खूप महत्त्व आहे. याशिवाय येथ पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या देखील अनेक गोष्टी आहेत. दरवर्षी येथे 51 हजार पर्यटक येथे भेट देतात.