PHOTOS : ‘दंश केल्यावर पाणीही मागू देत नाही’, ‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक विषारी साप
पृथ्वीवरील जीवघेण्या प्राण्यांपैकी एक म्हणजे साप. जगात सापाच्या एकूण 2500-3000 प्रजाती आढळतात. यापैकी काही निवडक सापच अतिविषारी आणि जीवघेणे आहेत. त्यापैकीच सर्वाधिक विषारी 5 साप पुढील प्रमाणे.
पृथ्वीवरील जीवघेण्या प्राण्यांपैकी एक म्हणजे साप. जगात सापाच्या एकूण 2500-3000 प्रजाती आढळतात. यापैकी काही निवडक सापच अतिविषारी आणि जीवघेणे आहेत. त्यापैकीच सर्वाधिक विषारी 5 साप पुढील प्रमाणे.
Follow us
पृथ्वीवरील जीवघेण्या प्राण्यांपैकी एक म्हणजे साप. जगात सापाच्या एकूण 2500-3000 प्रजाती आढळतात. यापैकी काही निवडक सापच अतिविषारी आणि जीवघेणे आहेत. त्यापैकीच सर्वाधिक विषारी 5 साप पुढील प्रमाणे.
सी स्नेक म्हणजेच समुद्री साप हा दक्षिण-पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियात आढळतो. हा साप जगातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक आहे. त्याचं काही मिलीग्रॅम विषही 1000 लोकांचा बळी घेऊ शकतं. हा साप समुद्रात आढळतो. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर कधीकधी या सापांचा हल्ला होतो.
इंनलँड तायपन हा साप जमिनीवरील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक आहे. तो आपल्या एका दंशात 100 मिलीग्रॅमपर्यंत विष सोडतो. हे विष 100 जणांचा सहजपणे जीव घेऊ शकते. याचं विष कोब्राच्या तुलनेत 50 पट अधिक घातक आहे.
इस्टर्न ब्राऊन स्नेक सापाची प्रजाती ऑस्ट्रेलियात आढळते. या सापाच्या विषाचा 14,000 वा भागही माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेसा आहे.
फिलिपीनी कोब्रा हा आपल्या भक्षाला चावत नाही तर थेट त्याच्यावर विष फेकतो. त्याचं विष न्यूरो टॉक्सिक आहे. म्हणजेत ते शरीरात गेलं की थेट श्वसनसंस्था आणि ह्रदयावर परिणाम करतं.
ब्लॅक माम्बा हा साप अत्यंत विषारी मात्र गर्दीत न येणारा लाजाळू साप आहे. ब्लॅक मांबाच्या केवळ मिलीग्रॅम विषानेही माणूस मरतो. मांबा हल्ला केल्यावर सलग 10-12 दंश करतो आणि 400 मिलीग्रॅम विष फेकतो.