PHOTO | भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे 93व्या वर्षात पदार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास शुभेच्छा
Follow us
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी लालकृष्ण अडवाणी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जात पंतप्रधान मोदी यांनी अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटरवरुनही अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या.
‘भाजपला जनमानसात पोहचवणे आणि देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना जम्नदिनाच्या शुभेच्छा. ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसह देशवासियांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो यासाठी मी प्रार्थना करतो’, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी गेल्यावर पंतप्रधान मोदी यांनी अडवाणींसमवेत केकही कापला.
त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान मोदींना केकचा एक तुकडा भरवला.