उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि इतर पक्षातील 20 ग्रामपंचायत सदस्यांनी तसंच इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षात प्रवेश केला.
या 20 जणांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रात शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी टाकलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणायला हवं. या सर्वांचं शिवसेनेत मनापासून स्वागत. सगळ्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारच्या माध्यमातून त्यांचे गावपातळीवरील प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणालेत.
यावेळी राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा सचिव भाऊसाहेब चौधरी तसंच नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.