गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे महाराष्ट्रातील राजकारणातील काका-पुतण्यांची जोडी. धनंजय मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. काका गोपीनाथ राज्याच्या राजकारणात सक्रीय असताना धनंजय यांच्याकडे बीडच्या राजकारणाची जबाबदारी होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेले. यामुळे त्याच विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. इथून काका-पुतण्या यांच्यात वादाची ठिणगी पडली. धनंजय यांची नाराजी दूर करण्यसाठी विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अर्थात विधानपरिषदेत आमदारकी देण्यात आली. मात्र तोवर काका-पुतण्या यांच्या नात्यात गाठ पडली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी काकांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरला होता.