Ajit Pawar | अजित पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी, राज्यातील राजकारणात मोठा भूकंप
Maharashtra Politics Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलीय. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय.
1 / 5
अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांची गेल्या साडेतीन वर्षात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तिसरी वेळ ठरलीय.
2 / 5
अजित पवार यांनी आज (2 जुलै 2023) राजभवनाच्या सभागृहात राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळेस मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
3 / 5
अजित पवार यांनी 30 डिसेंबर 2019 रोजी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रि म्हणून शपथ घेतली होती.
4 / 5
त्याआधी भाजपला पाठिंबा देत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे पदाची शपथ घेतली होती. तेव्हा तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच पवार यांना ही पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती. मात्र ते सरकार औटघटकेच ठरलं होतं.
5 / 5
दरम्यान अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आणि आमदार आदिती तटकरे या शपथ घेणाऱ्या एकमेव महिला ठरल्या आहेत. त्यामुळे आता या मंत्र्यांना कोणती खाती दिली जातात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.