प्रभू राम मंदिर गर्भगृहात रामलला विराजमान झालं आहेत. प्राणप्रतिष्ठाच्या अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघ चालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचंड प्रसन्न आणि आनंदी दिसत होते. त्यांना सर्व पाहुण्यांचं हात जोडून स्वागत केलं...
साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मिठी मारल्यानंतर दोघी देखील भावुक झाल्या...
प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील उपस्थित होते.
बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र शास्त्री देखील शुभ मुहूर्तावर अयोध्या याठिकाणी पोहोचले होते. त्यांनी देखील प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आनंद व्यक्त केला.
प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विकी कौशल - कतरिना कैफ, रणबीर कपूर - आलिया भट्ट, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, देखील पोहोचले होते.