काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला.
काही दिवसांआधी आशिष देशमुख यांना काँग्रेसने निलंबित केलं. आता आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूर शहराध्यक्ष प्रविण दटके, माजी आमदार अशोक मानकर यांच्यासह इतर भाजप नेते आणि आशिष देशमुख यांचे समर्थक मोठ्या संख्यने यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजप हा आशिष देशमुख यांचा अंतिम पक्ष असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.