मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्ताने शिर्डी दौऱ्यावर होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यादरम्यान शिर्डीत साईबाबा मंदिराला भेट दिली. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही साईबाबांच दर्शन घेतलं.
मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याव्यतिरिक्त यावेळेस अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 वर्षात दुसऱ्यांदा साईबाबांचं दर्शन घेतलं. शिंदेंनी याआधी 26 मार्च रोजी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं.