मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हा दौरा करत आहेत.
सागरी कर्नाटक भागाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान मंजुनाथाचे दर्शन घेऊन मनाला विलक्षण समाधान मिळालं, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
निसर्गाने समृद्ध असलेल्या या परिसरात अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरणातील या मंदिराला भेट देऊन वेगळेच अध्यात्मिक शांतता अनुभवण्यास मिळल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान धर्मस्थळाचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, भाजपचे स्थानिक उमेदवार हरीश पुंजा आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.