अडीज वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. त्यामुळे राजमहलाप्रमाणे महाराष्ट्र सदन सजलं आहे.
महाराष्ट्र सदनात एकनाथ शिंदे यांच्या पाहुणचारासाठी खास फुलांची सजावट करण्यात आली आहे.
महाराष्ट्र भवनात मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर खास फव्वारे, कारंजे सुरू करण्यात आले आहेत.
एकनाश शिंदे दिल्लीत असल्याने तिथल्या नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू झाला आहे. विविध नेते मंडळींची ते भेट घेत आहेत.
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची ते भेट घेणार आहेत.
शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.