विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात.
येत्या महिला दिनी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली
“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही ! असे कॅप्शन देत मिसेस फडणवीसांनी पोस्ट शेअर केली आहे
’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे.
पारंपरिक पोशाखात या गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी फोटोशूट केले आहे
मिसेस फडणवीसांच्या चाहत्यांची उत्कंठा ताणली गेली आहे.