ज्ञानवापीचा वाद संपूर्ण देशभज गाजतोय. सर्वेक्षणाचा काम संपलंय. सर्वेक्षणाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वेक्षण करणाऱ्या पथकाकडून नदींच्या मुर्तीसमोर आढळलेल्या एका तलावाची पडताळमी केली. त्यात एक शिवलिंग आढळलं, असा दावा हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी केलाय. त्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्यात आला. फक्त 20 लोकांना मशिदीत नमाज करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे दावा करण्यात आलेल्या शिवलिंगाचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
ज्ञानवापी मशिदीच्या आत असलेल्या एका छोट्या विहिरीच्या आतमध्ये हे शिवलिंग आढळून आलं, असा दावा करण्यात आलाय. वाराणसी कोर्टानं, त्यानंतर मशिदीच्या आजूबाजूचा परिसरा सील करण्याचे आदेश दिलेत. गेल्या काही दिवसांपासून हा वाद देशभर चर्चेत आलाय.
सर्वेक्षणासाठी आलेल्या एका टीमनं वॉटरप्रूफ कॅमेराच्या मदतीनं पडताळणी केली. तीन दिवस संपूर्ण मशिदीमध्ये कसून सर्वेक्षण करण्यात आलं. मशिदीतील तहखान्यापासून पश्चिमेतील भितींची व्हिडीओग्राफी करण्यात आली. या सर्वेक्षणातील बाबी आता कोर्टात सादर केल्या जाणार आहे. त्याद्वार पुढील न्यायालयीन लढाई लढली जाईल.
हिंदू पक्षकारांचे वकील मदनमोहन यादव यांनी शिवलिंग मिळाल्याचा दावा केला होता. नंदीच्या समोर हे शिवलिंग असून, ते पाण्यातून बाहेर काढून पाहिलं गेल्याचा दावा त्यांनी केलाय. शिवलिंग 12 फूट 8 इंची असल्याचं सांगितलं जातंय. शिवलिंग मिळाल्याचं कळल्यानंतर लोक उत्साहित झाले आणि हर हर महादेवचा गजर करु लागले.
14 मे रोजी मशिदीचा पहिला सर्वे झाला होता. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत मशिदीचं सर्वेक्षण झालं होत. तर दुसऱ्या दिवशी 15 मे रोजी देखील चार तास सर्वेक्षण चाललं. वजू स्थळ, पश्चिमी भिंती, नमाज पठणाची जागा यांचं सर्वेक्षण दुसऱ्या दिवशी करण्यात आलेलं. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी फक्त दोन तास सर्वेक्षणाचं काम झालं. यावेळीच शिवलिंग आढळून आल्याचा दावा करण्यात आला.