अभिनेत्री कंगना रनौत... अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी कंगना आता लोकसभेच्या रिंगणात उतरलीय. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढते आहे.
लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या कंगनाने आपल्या पेहरावात बदल केला आहे. आधी वेस्टर्न आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणारी कंगना आता साडीत दिसतेय.
सुती साडी नेसून कंगना प्रचार करताना दिसते. त्याचबरोबर हिमाचलची प्रसिद्ध पहाडी टोपीही कंगना डोक्यात घालते. ठिकठिकाणी प्रचारासाठी गेल्यावर कंगनाला लोक हार घालतात.
सुती साडी, पहाडी टोपी अन् गळ्यात उपरणं... प्रचारसभांदरम्यानचा असा हा कंगनाचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
कंगना या प्रचारसभांदरम्यान सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत आहे. त्यांच्या एकरूप होत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. प्रचार सभेदरम्यान कंगना स्थानिकांसोबत जमीनीवर बसलेली दिसली. तिचा हा फोटो चर्चेत आहे.