आतून-बाहेरून मन थरारतंय, अंगावर रोमांच उभा राहिलाय; देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला भावनिक क्षण

| Updated on: Jun 28, 2023 | 7:51 AM

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी दिव्यांग भगिनीने ओवाळलेले फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यावेळी आपण भावूक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

1 / 5
आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच..., असं फडणवीस यांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

2 / 5
पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे", असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

3 / 5
हे पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनातील भाव व्यक्त केलेत.

4 / 5
देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असलेल्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ संस्थेलाही भेट दिली.

5 / 5
दीपस्तंभ फाऊंडेशनच्या 'मनोबल'संस्थेतील दिव्यांग बांधवांनाच्या भेटीचे फोटो देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.