जेजुरी ग्रामस्थांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी जेजुरी मंदीर ट्रस्ट संदर्भातील वाद राज ठाकरे यांना सांगितला.
मागच्या काही दिवसांपासून जेजुरीत वाद सुरू आहे. मागच्या 10 दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे. यासंदर्भात ही भेट घेण्यात आली.
या भेटीवेळी राज ठाकरे यांच्या समोर जेजुरीच्या ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. तसंच या वादात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
जेजुरी मंदीर देवस्थान समितीवर करण्यात आलेल्या नियुक्तांवरून सध्या वाद सुरू आहे. या निवडी दरम्यान जेजुरीतील स्थानिकांना डावलण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
याविरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेजुरी गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज या गावकऱ्यांनी राज ठाकरे यांचीदेखील भेट घेतली आहे.