विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उडी मारली. यावेळी त्यांनी काही कागदपत्रही फेकली. यामुळे मंत्रालयात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
Follow us
सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या.
उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उडी मारली. यावेळी त्यांनी काही कागदपत्रही फेकली. यामुळे मंत्रालयात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे.
तसेच धनगर आणि धनगर एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांकडून सातत्याने विरोध केला जात आहे.
यातील कोणत्याही मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आदिवासी आमदारांनी आक्रमक पाऊल उचललं आहे.
आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते.
त्या प्लॅन बीनुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारल्या. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात दाखल झाली.
यानंतर पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर हे आमदार सहभागी आहेत.
आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असा आरोप करिण लहामटे यांनी केला. तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले.