Maharshtra Politics | ठाकरे गट-मनसे युतीची चर्चा, आता राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट, नक्की कारण काय?

| Updated on: Jul 07, 2023 | 5:39 PM

Mns Chief Raj Thackeray Meets Cm Eknath Shinde | राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. या दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

1 / 6
Maharshtra Politics | ठाकरे गट-मनसे युतीची चर्चा, आता राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट, नक्की कारण काय?

2 / 6
मात्र यानंतर आज 7 जुलै रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगत आहेत.

3 / 6
मनसे-ठाकरे गटाच्या युतीदरम्यान झालेल्या ठाकरे-मुख्यमंत्री भेटीमुळे  आता मनसेप्रमुख हे  शिंदेच्या की ठाकरेंच्या नक्की कोणत्या शिवसेनेसोबत जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

4 / 6
मात्र मनसेप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. या तासभर चाललेल्या बैठकीत या 2 नेत्यांमध्ये राजकीय घडामोडींसदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

5 / 6
ठाकरे-शिंदे यांच्यात या भेटीदरम्यान नाशिक जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. तसेच बीडीडी चाळ,   पोलीस वसाहत आणि नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या मुद्द्यांवर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

6 / 6
दरम्यान ठाकरे-शिंदे भेटीमुळे  राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.