ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केला होता. त्याविरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केलं आहे.
महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत महाविकासआघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
पुण्यातील एका पुरस्कार वितरण सोहळ्यात गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता.त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
जामनेरच्या नगरपालिकेसमोर महाविकास आघाडीच्या वतीने गिरीश महाजन विरोधात घोषणाबाजी करत करण्यात निदर्शने करण्यात आली.