राजकारणात काही नेते आपल्या पेहरावाची विशेष काळजी घेतात. ते समोर दिसले की, लगेच त्यांचा लूक नजरेत भरतो, चर्चा सुरु होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अशाच नेत्यांपैकी आहेत. राज ठाकरे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आले की, भाषणा इतकीच त्यांच्या लूकची सुद्धा चर्चा होते.
राज ठाकरे दमदार भाषण करतातच. पण त्यांचा जो पेहराव आहे, त्यामुळे आजच्या तरुणाईला ते जास्त भावतात, जवळचे वाटतात. त्यांचा लूक नेहमी चर्चेचा विषय बनतो.
राज ठाकरे आज अलिबागला निघाले आहेत. राज यांनी यावेळी रो-रो ने प्रवास केला. राज या विशालकाय जहाजावर आपल्या गाडीतून उतरताच त्यांचा ढासू लूक नजरेत भरला.
अलिबागला आज मनसेची जमीन परिषद होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे तिथे चालले आहेत. रो-रो मुळे मुंबई अलिबाग प्रवास 45 मिनिटांवर आला आहे. त्यामुळे वेळही प्रचंड वाचतो.