मंत्रालयातील वॉर रूममध्ये महत्वाची बैठक; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीत, कोणत्या विषयांवर चर्चा?
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक; मंत्रालयातील वॉर रूममध्ये महत्वाची बैठक पार, कोणत्या मुद्द्यांवर महत्वाची चर्चा? वाचा सविस्तर...
निवडणुकीच्या आधी राज्यातील प्रमुख महत्वाचे प्रकल्प मार्गी लावणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यानंतर आजच्या या बैठकीला विशेष महत्व आहे.
Follow us
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. यात राज्यातील सर्व महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
देवंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात महाराष्ट्रातील गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रॅक्टर त्याचबरोबर प्रमुख महत्वाच्या प्रकल्पांमध्ये होणारी भविष्यातील गुंतवणूक याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
निवडणुकीच्या आधी राज्यातील प्रमुख महत्वाचे प्रकल्प मार्गी लावणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यानंतर आजच्या या बैठकीला विशेष महत्व आहे.
शिवाय नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वी. आर. सुब्रमण्यम हे देखील मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली.