Raksha Bandhan 2023 : सण रक्षाबंधनाचा, बहीणभावाच्या प्रेमाचा!; 13 वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींचं रक्षाबंधन

| Updated on: Aug 31, 2023 | 8:40 AM

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या नात्यातील प्रेमळ दिवस. या दिवशी बहिण-भाऊ एकमेकांना भेटतात. बहिण भावाला राखी बांधते. तर भाऊ तिचं रक्षण करतो तसंच कायम तिच्या पाठीशी राहण्याचं, तिच्यावरचं प्रेम कायम ठेवण्याचं वचन देतो. याच रक्षाबंधन सणानिमित्त मुंडे बंधू-भगिनीही एकत्र आले. पाहा फोटो...

1 / 5
धनंजय मुंडे यांनी 2009 साली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यानंतर मुंडे बंधू-भगिनींमध्ये रक्षाबंधन सण साजरा झाला नव्हता. पण यंदा तब्बल 13 वर्षांनंतर मुंडे भावंडांनी राखी पौर्णिमा साजरी केली.

2 / 5
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. तसंच त्यांना राखी बांधली.

3 / 5
खासदार प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांना राखी बांधली. तसंच यशश्री मुंडे यांनीही राखी बांधली.

4 / 5
तब्बल 13 वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींनी एकत्र रक्षाबंधन साजरं केलं. हे बंध रेशमाचे..., अस म्हणत धनंजय मुंडे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. मुंडे समर्थकांची या फोटोंना पसंती मिळते आहे.

5 / 5
मुंडे बंधू भगिनींनी रक्षाबंधन साजरं केलं. तेव्हा पंकजा यांच्या आई प्रज्ञा मुंडेही उपस्थित होत्या. राखी बांधल्यानंतर फॅमिली फोटो काढण्यात आला.