महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काहीवेळा आधीच ते मुंबईत दाखल झाले आहेत.
भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. राजभवनावर जात त्यांनी बैस यांची भेट घेतली.
रमेश बैस यांनी भगतसिंग कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भेट दिली. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायलयाने भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांचे निर्णय चुकीचे असल्याचं न्यायालयाने म्हटलं. या घडामोडींनंतर कोश्यारी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आहेत.
भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची कारकीर्द वादात राहिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत तसंच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली.