
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं जात आहे. सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. लडाखमध्ये 14 हजार 270 फूटांच्या उंचीवर राहुल गांधींनी त्यांना नमन केलं.

तर संसद परिसरातही काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना अभिवादन केलं. त्यांना आदरांजली अर्पण केली.